Breaking News

जनावरांना चार्‍यासह पाण्याची केली सोय


उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागली असून ऊन्हाळा चांगलाच जाणवत आहे, त्यामुळे पानवठे ओस पडू लागले आहेत. जनावरांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे उन्हाळा सुरू झाला की मुक्या प्राण्यांना पाण्याबरोबर हिरवा चारा गेली 25 वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे सोय करत आहेत. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रिय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी गेली पंचवीस तीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. अपघातातील जखमींना मदत, पाणपोया, गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाज प्रबोधन करणे, ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना 24 तास मदत, बस स्टॅण्डवर अनेक दिवस पडलेले बेवारस वृध्द आणून वाचवले, असे अनेक कार्य करत असल्याचे प्रफुलकुमार सोळंकी यांनी सांगितले.यावेळी कोठारी म्हणाले की, महत्वाचे म्हणजे या पाण्याच्या हौदात गाय, बैल, गाढवे, कुत्रे सर्व प्राणी पाणी पितात याचे मला समाधान वाटते. मुक्या जनावरांना पाणी व चारा देतात हे पाहून अनेकांनी कोठारी यांचे अभिनंदन केले.