राहुरी खुर्द येथील हॉटेल संघर्षवर छापा अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या हॉटेल संघर्ष येथे काल दि. 21 मार्च रोजी दुपारी डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील पोलिस उपनिरीक्षक शकिल सय्यद, हवालदार बाळू साबदे, संजय कदम, महिला पोलिस नाईक अश्विनी पवार आदिंच्या पथकाने कारवाई करुन वेश्या व्यवसाय करणार्या दोन तरुणी व दोन ग्राहकांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायीकांचे धाबे दणानले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील राहुरी खुर्द येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर हॉटेल संघर्ष येथे अनैतिक वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत वाकचौरे यांनी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान पोलिस पथक तयार करुन हॉटेलवर धाड मारली असता, तेथे व्यवसाय करणार्या दोन परप्रांतीय तरुणींना व दोन-तीन ग्राहकांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर यावेळी हॉटेल चालक पसार झाल्याचे समजले आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस पथकाने या कारवाई दरम्यान मोटरसायकल व काही विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करून, हॉटेलला सील करण्यात आले.