बाप लेकाचे अपहरण करून 5 तोळे सोन्यासह 30 हजाराची खंडणी
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील बाप लेकाचे अपहरण करून 5 तोळे सोने व 30 हजार रुपये वसूल केल्याचा गुन्हा दि. 21 मार्च रोजी राहुरी पोलिसांत दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आण्णासाहेब कारभारी शेळके (वय 36 वर्षे) रा. ब्राम्हणी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आण्णासाहेब शेळके हे दि. 19 मार्च 2018 रोजी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान आपल्या घरातून स्कूटी गाडीवर ब्राम्हणी गावात जात असतांना ब्राम्हणी हायस्कूल शाळेसमोर पप्पू कल्हापूरे व त्यांच्या दोन-तीन साथीदारांनी चारचाकी वाहन आडवे घालून शेळके यांना, आपल्याला सोनई येथे कामानिमित्त जायचे आहे तू आमच्या गाडीत बस, असे म्हणून शेळके यांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांच्या घरी देसवंडी येथे नेले. तेथे पप्पू कल्हापूरे शेळके यांना 50 हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यावर शेळके यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे म्हटल्याचा राग आल्याने त्याने शेळके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावर शेळके म्हणाले माझ्याकडे फक्त 30 हजार रुपये आहेत, ते देतो. असे म्हणून शेळके यांनी त्यांचा मित्र सोन्या राजू वैरागर यास फोन करुन शेळके यांच्या घरुन तीस हजार रुपये रोख व एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन व्यंकटेश हॉटेल येथे ठेवण्यास सांगितल्या. त्यावर पप्पू कल्हापूरे म्हणाला की, मला आणखी पैसे पाहिजेत. तूझा मुलगा आमच्या ताब्यात दे व तू घरी जाऊन पैसे आण.
यावेळी शेळके यांनी त्यांच्या मित्राला फोन करुन त्यांचा मुलगा वैभव याला बोलावून घेतले. शेळके यांनी घरी जाऊन चार तोळे वजनाचे बायकोचे सोन्याचे दागिने घेऊन पप्पू कल्हापूरे याला दिले. या घटनेवरून पप्पू कल्हापूरे (रा. देसवंडी), सिद्धांत मनोज आंबिलवादे व बबन लक्ष्मण राऊत या तिघां विरोधात पैशाच्या मागणीसाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.