Breaking News

नाशिक क्रिडा विभागात ढवळपुरी मुलींचा कब्बडी संघ अजिंक्य


पारनेर/ प्रतिनिधी /- नाशिक विभागीय क्रिडा स्पर्धामध्ये पारनेर तालुक्यातील लमाणतांडा (ढवळपुरी ) येथील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गट कब्बडी मध्ये नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावुन नगर जिल्हयाचे नेतृत्व केले.

चला खेळुया विभागा अंतर्गत नाशिक विभागीय कब्बडी क्रिडा स्पर्धा नाशिक येथे नुकत्याच पार पडल्या. या क्रिडा स्पर्धामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्हयाचे विजेते संघ सहभागी झाले होते. अहमदनगर जिल्हयाचे कब्बडी मुली लहान गटाचे नेतृत्व जि.प. प्राथमिक शाळा, लमाण तांडा ( ढवळपुरी ) ता. पारनेर संघाने केले. प्रथम धुळे संघाचा पराभव करून अंतिम फेरीत जळगाव संघाला धुळ चारून अजिंक्यपद पटकावले. या संघाच्या खेळाडुना सुनिल शेळके, मुख्याध्यापक रेवणनाथ नरवडे, भास्कर खैरे, निर्मला तराळ, राजू नरवडे, अंबादास ठाणगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे क्रिडा आधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, जि.प. सदस्या सुप्रिया झावरे, गट शिक्षणाधिकारी संभाजी झावरे. सरपंच डॉ. राजेश भनगडे, विस्तार आधिकारी कार्ले, केंद्रप्रमुख पटेल, माजी सरपंच बबनराव पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेमीचंद राठोड यानी अभिनंदन केले. महिलादिन निमित्त गावातुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.