Breaking News

नेवासा शहर इंदिरा कॉंग्रेसच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत


नेवासा /शहर प्रतिनिधी/- जागतिक महिला दिनानिमित्त नेवासा शहर इंदिरा कॉंग्रेसच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले.जागतिक महीला दिनानिमित्त नेवासा शहरात इंदिरा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय सुखधान, नगरसेविका शालिनी सुखधान, नगरसेवक दिनेश व्यवहारे यांनी आज नेवासा ग्रामीण रुग्णालयात जाऊन रेखा गणेश पवार या गोधेगावच्या महिलेच्या आजच जन्मलेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत केले.

यावेळी सुखधान कुटुंबाने मुलीच्या आईला साडी तसेच मुलीला ड्रेस दिला. तसेच पुष्पगुच्छ देऊन आईचे स्वागत केले. आणि ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि पेशंटला देखील पेढे वाटून स्त्री जन्माचे स्वागत केले.यावेळी अनिता कदम, लता जाधव, शीला सुखधान, योगिता बिबवे, मनीषा नवगिरे, पूजा थोरात या परिचारिका हजर होत्या. सुखधान कुटुंबाच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.