Breaking News

पारनेर राष्ट्रवादीच्या पक्षाच्या बैठकिला उचाळे,नगरे यांची दांडी


पारनेर/ प्रतिनिधी /- बाजार समित़ीच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची तालुकाध्यक्ष पदाचे अर्ज मागविण्या संदर्भात पक्ष निरिक्षक विठ्ठलराव लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या बैठकीस पक्षाने निरोप पाठवुनही उपसभापती दिपक पवार, मा. जि. प. सदस्य मधुकर उचाळे, मा. पं. स. सदस्य शंकर नगरे उपस्थित न राहिल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीतील धुसफूस वाढत चालली आहे. 

या बैठकीत तालुकाध्यक्ष पदासाठी विद्यमान तालुकाध्यक्ष दादा पठारे, बंडखोर गटाचे अशोक सावंत व सोमनाथ वरखडे, पितापुञ सबाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, अरुण ठाणगे, यांनी पक्ष निरिक्षकांकडे अर्ज सादर केले आहेत. कै. आम. वसंतराव झावरे यांच्या स्मृतीदिनाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येउन गेले. त्यावेळेस असे वाटले की पक्षात आता काही धुसफूस होउ शकणार नाही. पण काही दिवसातच जैसे थे दिसुन आले आहे. त्यातच भर पडली ती मा.जि.प.सदस्य मधुकर उचाळे आणि मा. पं. स. सदस्य शंकर नगरे यांच्या अऩुपस्थिने पक्षात काही अलबेल नसल्याचे चिञ दिसत आहे. मा. जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या बरोबर सावली सारखे असणारे नगरे हे काही दिवसा पासुन लांबच आहेत. तसेच उचाळे, सावंत, पवार, वरखडे, नगरे, यांच्या मनात नक्की काय चाललय. दिनेश औटीच्या पाठोपाठ नगरे ही काही वेगळा निर्णय घेणार का? काही दिवसातच अजुनही दोन मोठाले धक्के पक्षाला नेतृत्वामुळे सहन करावे लागेल असेच दिसुन येत आहे.