कुकाणा /प्रतिनिधी /- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या प्रतिष्ठानने प्रत्येक वर्षी विविध उपक्रम बरोबरच विविध स्पर्धाचे आयोजन करून सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य करणा-या व्यक्तीनां सन्मानित केले. गतवर्षी पासुन राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रथम बक्षीस रोख रक्कम ३०१/- रूपये, द्वितीय बक्षीस २०१/- रूपये, तृतीय बक्षीस १०१/- रूपये व सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, उत्तेजनार्थ म्हणून दोन स्पर्धकांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र तर सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेसाठीचे विषय - १) छत्रपती शिवाजी महाराज यांचे संघटन २) समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य ३) बहूजनांचे पाठीराखेः छत्रपती शाहू महाराज ४) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची राष्ट्रभक्ती या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध सादर करावा. यासाठी शब्द मर्यादा एक हजार ते दीड हजार पर्यंत असुन स्पर्धकांनी आपले निबंध सुवाच्च स्व:हस्ताक्षरात लिहून एक पासपोर्ट फोटो, दोन कोरे लिफाफे व १५/- रुपयाची पोस्टाची तिकीटे " सचिव, पत्रकार सुनिल पंडित युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठान ( चिलेखनवाडी ) कुकाणा ता.नेवासा जिल्हा, अहमदनगर या पत्त्यावर दिनांक ३१ मार्च २०१८ पर्यंत पोहचतील या पध्दतीने पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा.डाॅ.संतोष तागड, सचिव पत्रकार सुनिल पंडित व पदाधिका-यांनी केले आहे
खुल्या निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:45
Rating: 5