Breaking News

अग्रलेख - सोशल मीडिया ; दुधारी शस्त्र

सध्याचे देशातील राजकारण आणि सोशल मीडिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणूकांच्या निमित्ताने याच सोशल मीडियाचा वापर विविध राजक ीय पक्षांनी प्रभावीपणे करून घेत देशात सत्ता स्थापन केली होती. वास्तविक जनमतांचा कौल जाणून घेण्यासाठी वेळीवेळी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. जनसामान्यांच्या आवडीनिवडी, या सर्व बारीक-सारीक बाबींचा अभ्यास करून, त्यांचा कौल जाणून घेतला जातो, त्यांनतरच राजकीय पक्ष आपल्या ध्येयधोरणांत बदल करत असतांत. तर अनेक वेळेस राजकीय हवा फिरविण्यासाठी वादग्रस्त मुद्दे उकरून काढल जातात, आणि ते कायमच चर्चेत ठेवण्यात येतात. त्यामुळे मतांचे धु्रवीकरण करणे सहज शक्य होते. 2014 साली लोकसभेच्या निवडणूकींच्या वेळी भाजपाने या सर्व बाबींचा मोठया खूबीने वापर करून घेतला. मात्र आज चार वर्षांच्या कालावधीत, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. एके काळी भाजपाचा आणि नरेंद्र मोदी यांचा जो उदोउदो सोशल मीडियावर सुरू होता, तो आता ओसरला असून, भाजप व पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड सोशल मीडियावर मोइया प्रमाणात होत आहे. त्यामुळे एकेकाळी तारणारा सोशल मीडिया आता भाजपासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. त्यामुळेच फेसबुक डिलिट करू अशी भाषा केंद्रीय मंत्री वापरत आहे. फेसबुकवरील डाटा चोरी होत आहे. याला लगाम घालण्याची गरज आहे. कारण यातून तांत्रिक बाबींमुळे माहितीचा जसा विस्फोट झाला, तसाच राजकीय क्षेत्रात देखील यामुळे स्फोट होऊ शकतो. अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक डेटा चोरी व लीक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. कोटयावधी युजर्सचा डेटा चोरून आपल्या खासगी फायद्यासाठी विकण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये भारतीय युजर्सचीही गोपनीय माहिती असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती. 
सध्या जगभर फेसबुकवरून सामान्यांच्या माहितीची, डेटाची चोरी होऊन त्यांचा गैरवापर होत असतानाच भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात 20 कोटीहून अधिक फे सबुक युजर्स आहेत. या सर्वांची माहिती, डेटा राजकारणासाठी देशाबाहेर फेसबुक मार्फत नेला जाण्याचा धोका आता निर्माण झाला आहे. यामुळे भारताच्या निवडणुकाही प्रभावित होऊ शकतात. 2016 साली अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा चोरी झाल्याचे उघड झाले आहे. तसेच या डेटाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढच्या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने ही भूमिका स्पष्ट केली असली, तरी सोशल मिडीयावर सरकार बंधने घालू शकत नाही. क ारण देशातील प्रत्येक नागरिकांला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सरकारची चांगली बाजू किंवा, सरकारवर टीका असो, ती व्यक्त होण्याचे प्रभावी साधन म्हणजेच फे सबुक. अशावेळी तुम्ही लोकांना व्यक्त होण्यापासून रोखू शकणार नाही. तसेच फेसबुकवरील माहिती कशी सुरक्षित राहील यासासठी उपाययोजना करणे, फेसबुकशी संपर्क साधणे, या महत्वाच्या बाबी सरकारने करणे आवश्यक आहे. त्याऐवजी फेसबुक डिलिट करण्याची बाळबोध वक्तव्य केंद्रीय मंत्र्यांना शोभणारे नाही.