Breaking News

नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा थेट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारी धोरणांवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील हल्लाबोल मोर्चाला ते संबोधित करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोलच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाऊन सामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचा संदेश दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्र व कोक णच्या जिल्ह्यांतही हल्लाबोल यात्रा पोहोचेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

हल्लोबोल मोर्चाला संबोधित करताना ते म्हणाले की, पीएनबी घोटाळ्याचा परिणाम असा की, आता उद्योग सुरू करण्यासाठी जर युवक बँकेत गेले तर त्यांना कर्ज दिले जात नाही. सध्या रेशन दुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका देऊ लागले आहेत. बाहेरच्या देशात मका हे पशुखाद्य म्हणून वापरले जाते. जनतेला जर नीट अन्नधान्य पुरवता येत नसेल तर सत्तेत राहून सरकारचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला. देशात महागाई वाढली आहे, संसार चालवणं कठीण झालं आहे. कारखाने बंद होऊन नवीन रोजगार मिळत नाही. कामगार वर्गावर अन्याय होत आहे.
विदर्भातील आमच्या सहकार्‍यांनी मला सांगितले की, रेशन दुकानामध्ये आता गहू, तांदूळ देण्याऐवजी मका द्यायला सुरुवात झाली आहे. जो पशूखादय म्हणून मका बाहेरच्या देशात वापरला जातो तो मका माझ्या शेतकर्‍याची भूक भागवण्यासाठी दिला जात आहे. जनतेला जर नीट अन्नधान्य पुरवता येत नसेल तर सत्तेत राहून तुमचा काय उपयोग असा संतप्त सवालही शरद पवार यांनी केला. ना मै खाऊंगा और ना किसिको खाने दुंगा.. अशी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांची मने जिंकली. मुंबईतला एक मोदी पीएनबी बँकेचा साडे अकरा हजार कोटींचा घोटाळा करुन पळून जातो, तरी त्याला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणती योजना नाही. परिणामी माझा कष्ट करणार छोटा उदयोग क रणारा उदयोजक मात्र अडचणीत येत आहे. 
पीएनबी घोटाळ्याचा परिणाम असा की, आता उद्योग चालू करण्यासाठी जर युवक बँकेत गेले तर त्यांना कर्ज दिले जात नाही अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. पर्यावरण खात्याच्या परवानग्या बाकी होत्या. तेवढयात सरकार बदलले आणि लगेच पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन के ले. मात्र दोन वर्षात शिवस्मारकाची वीटही रचलेली नाही.