Breaking News

एकबोटे यांना काळे फासण्याचा प्रयत्न

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाच्या आवारात काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर एकबोटे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने एकबोटे यांची पोलीस कोठडी 21 मार्चपर्यंत वाढवली आहे. कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयातून बाहेर पडताना एकबोटे यांच्यावर काळे फासण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर एकबोटे समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.