Breaking News

राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत राडा

पुणे : शहरातील राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान राडा झाला. यावेळी मतपेट्या, टेबल, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा राडा केल्याचे समजते. राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक सुरू होती. त्यावेळी भाजपने काँग्रेसचे सदस्य फोडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावरून झालेल्या वादाचे रुपातंर राड्यात झाले आणि उपस्थित सदस्यांनी मतपेट्यासह कक्षातील टेबल खुर्च्यांचीही तोडफोड केली आहे.