Breaking News

गोदड महाराजांची दिंडी निघाली गुरू भेटीला


कर्जतचे ग्रामदैवत श्री गोदड महाराज यांची दिंडी काल सायंकाळी 5 वा. गोदड महाराज मंदीरातुन पैठणला जाण्यासाठी निघाली. या वेळी कर्जत शहरातील व पंचकोशीतील भावीक मोठया प्रमाणात उपस्थित होते. दिंडीला वाटे लावण्यास भक्त मोठया संख्येने उपस्थित राहुन फटाक्याची आतषबाजीसह ज्ञानोबा, तुकारामाच्या गजरात कर्जत शहर भक्तीमय वातावरणात बुडाले. अनेक ठिकाणी या दिंडीचे उस्फुर्त रांगोळी काढुन नागरिकानी शरबत व दूध देवून दिंडीतील भक्ताचे स्वागत करत दिंडीस निरोप दिला. या दिंडीच्या स्वगता बरोबरच पालकीतील गोदड महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोकाची रांग लागलेली होती. षष्ठी वारी पायी दिंडी सोहळा 1 ते 8 मार्च दरम्यान होत असुन या दिंडी सोहळ्यात बहुसंख्यने भावीक कर्जत ते पैठण पायी चालत असतात. हा दिंडी सोहळा श्री संत गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्जत भुमीतून सुरू होतो.