Breaking News

काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम कालवश

मुंबई/प्रतिनिधी /- चाळीस वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे काँग्रेसचे जेष्ठ नेते,माजी मंञी , आणि प,महाराष्ट्राच नव्हे तर राज्य पातळीवर लोकनेता म्हणून सुपरिचीत असलेले पतंगराव कदम यांचे राञी साडे दहा वाजता लिलावती रूग्णालयात निधन झाले. 


त्यांचे निधन किडनीच्या आजारामुळे झाले. राजकारणात पक्षनिष्ठेचे एक मुर्तीमंत उदाहरण म्हणून पतंगराव कदम यांच्या राजकीय जीवनाकडे पाहिले जात होते. पतंगराव कदम यांच्यावर लिलावती रूणालयात उपचार सुरू होते. वयाच्या ७३ व्या वर्षी पतंगराव कदम यांची एक्झीट झाल्याने महाराष्ट्राचे राजकारण, सहकार, शिक्षण यासारखे लोकचळवळीचे स्रोत पोरके झाल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांचे वडील पतंगराव कदम हे भारती विद्यापीठाचे संस्थापक आहेत. वयाच्या १९ व्या वर्षी अवघ्या सत्तर रूपये महिना मिळणाऱ्या नोकरीपासून त्यांनी आपल्या आयुष्याची सुरूवात करून राज्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. 

त्यांच्या निधनावर मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंञी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, ना.चंद्रकांत दादा पाटील, ना,राधाकृष्ण विखे पाटील, खा.सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार त्यांच्या गावी करण्यात येतील.