Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांचा कुळधरणला सत्कार


कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कायाकल्प पुरस्कार संपादन करीत दोन लाखांचे बक्षीस संपादन केल्याबद्दल येथील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचा सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आरोग्य केंद्र तसेच विद्यालयात मान्यवरांनी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेतील समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, डॉ. सुभाष शिंदे, पोलीस पाटील समीर जगताप, त्रिमूर्ती उद्योग समुहाचे महेंद्र गुंड आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आरोग्य केंद्राच्या कामाचे कौतुक करीत शुभेच्छा व्यक्त केल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.टी. सोनवणे यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांच्या सहकार्यानेच हे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. नूतन मराठी विद्यालयात जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी सत्कार केला. प्राचार्य सूर्यभान सुद्रिक, पर्यवेक्षक भागवत घालमे यांच्यासह मान्यवर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य केंद्रात कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शेषेराव सुपेकर यांच्या हस्ते सत्कार झाला. महादेव सुपेकर, बंटीराजे जगताप, सुधीर जगताप, बंडू सुपेकर, किरण जगताप, मधुकर सुपेकर यांच्यासह आरोग्य सेवक सतिश डिसले, राहुल कांबळे, जुबेदा पठाण, मनिषा जाधव, रमेश पवार, मंगल शेळके, स्वप्नील शिंदे, परिचर राजश्री चव्हाण, अंजली कानडे तसेच उत्तम गुंड, रायचंद थोरात, संजय भैलुमे आदी उपस्थित होते.