Breaking News

नगरपालिकेला सहकार्य करा : पिपाडा


राहाता प्रतिनिधी : मराठी नववर्षानिमित्त शहराच्या विकासासाठी नवे पर्व सुरु करण्यासाठी शहरवासियांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी केले. नगरपालिकेत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी राहता नगरपालिका कार्यालयासमोर याहीवर्षी नगराध्यक्षा पिपाडा यांच्या हस्ते गुढीपूजन करुन गुढी उभारण्यात आली. यावेळी भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, डॉ. मंगला गाडेकर, निवृत्ती गाडेकर, निलम सोळंकी, विजय सदाफळ, विमल आरणे, मुख्याधिकारी बद्रीकुमार गावित आदी उपस्थित होते.