बीआरएसपीची रिझर्व्ह बँकेविरुद्ध निदर्शने
अँड. डॉ. सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष अँड. डॉ. सुरेश माने, उपाध्यक्ष अँड. प्रकाश आहेर, महासचिव सर्वजीत बनसोडे, जितेंद्र निकाळजे, जितेंद्र कातरिया, संजय वाघमारे, संतोष तळेकर, हमिर विजुंडा, राम तंगारे, सुजव सवणे, कांती मकवाण, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष डँनियल गायकवाड, सुभाष कदम, मोहन माळी, एमआयएमचे इम्रान शेख, पोपट भालेराव, रॉकी गायकवाड, आनंद सुर्यवंशी, निता भिगारदिवे आदी उपस्थित होते. यावेळी उद्योगपतीबाबत सरकारचे धोरण, पनामा व पँरेडाईज पेपर्स घोटाळा, विजय माल्या, ललित मोदी व निरव मोदी यानी देशाबाहेर केलेले पलायन आदी प्रश्नांसंदर्भात सरकारला जाब विचारण्यात आला.