Breaking News

स्थानिक ग्रामस्थांनी स्व. मोरेंचा वारसा जपला : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी ;- तालुक्याच्या सर्वांगिण विकासात अनेक कार्यकर्त्यांनी समर्थ साथ दिली. यामध्ये स्व. अशोकराव मोरे यांचा पुढाकार अग्रस्थानी होता. पिंपळगांव कोंझिरा ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व जागा एकतर्फी जिंकून येथील ग्रामस्थांनी स्व. मोरेंचा वारसा समर्थपणे जपला आहे, असे गौरवोदगार माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले. 

आ. थोरात यांच्या ‘सुदर्शन’ या निवास्थानी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार झाला. यावेळी आ. थोरात यांनी स्व. मोरे यांनी तालुक्यात केलेल्या रचनात्मक कामांची आठवण करुन दिली. ते म्हणाले, पिंपळगांव कोंझिराच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी विकासाभिमुख काम करावे. येथील सर्व सहकारी संस्थांचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे. यापुढेही तो असाच सुरु राहिला पाहिजे, यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे. या निवडणुकीत लक्ष्मण अडांगळे, मोनाली कर्पे, रोहिणी कोकणे, सुभाष कर्पे, जिजाभाऊ मोरे, कुसुम गाढे, जयराम कर्पे, गिता आहेर, ज्योती कर्पे यांन प्रचंड मताधिक्य मिळविले. 

या निवडणुकीसाठी आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच थोरात कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खर्डे, बापूसाहेब कर्पे, बादशाह आहेर, सखाराम कोकणे, महेश कर्पे, सुरेखा कोकणे, रमा अडांगळे, दत्तात्रय खिल्लारी, सुरेश निळे, संदीप कर्पे, विकास आहेर. मच्छिंद्र आहेर, संतोष कर्पे, संजय आहेर, विक्रम मोरे, सचिन कर्पे, सागर आहेर, संगम आहेर, राधाकिसन कर्पे, केरुभाऊ मोरे, मनोज कोकणे, मारुती बोर्‍हाडे, जालिंदर मोरे, राजेंद्र कर्पे, अजय खिल्लारी, विलास आहेर, बहिरु आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.