Breaking News

बालमनावरील संस्कासरांसाठी हरिपाठ संकल्पना : हा. भ. प. रामगिरी


लोणी।प्रतिनिधी - अध्यात्मातील हरिपाठ हा संस्काराचा मोठा भाग आहे. परंतू, प्राथमिक शाळेच्या माध्यमातून असेल किंवा शालेय शिक्षणातून हरिपाठ पाळला पाहिजे. बालमनावर संस्कार करण्यासाठी हरिपाठ ही संकल्पना शालेय पातळीवर राबविण्याची गरज आहे यासाठी पुढाकार घेतला तर संस्कारक्षम पिढी घडेल, प्रतिपादन मुक्ताई ज्ञानपीठाचे ह. भ. प. स्वामी रामानंदगिरी महाराज यांनी केले.

राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे आयोजित केलेल्या साई सतचरिञ पारायण आणि किर्तन महोत्सवात मंहत रामानंदगिरी महाराज बोलत होते. ते म्हणाले, आपण ज्या क्षेत्रात काम करतांना तेथे आदर्श काम म्हणजेच परमेश्वर चिंतन आहे. आज चिंतन कमी झाल्याने चिंता वाढली आहे. देशाच्या संतांवर परदेशात संशोधन होते. पण आज आपल्याला आपल्या संताचा परिचय करुन द्यावा लागतो. बालसंस्कार ही काळाची गरज आहे. पण त्याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. हरिपाठ हा हरीच्या जवळ जाण्याची जादू आहे. ही संकल्पना शालेय पातळीवर शासनाने राबविली तर सक्षम देश निर्माण होईल. दरम्यान, वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उध्दव महाराज मंडलिक, नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने गुरुवारी {दि. ८ } या सप्ताहाची सांगता होणार आहे.