Breaking News

पुतऴे तोडणार्‍यांवर कारवाई करा : अमित शहा


नवी दिल्ली : भाजपाशी संबंधित नेते किंवा कार्यकर्त्यांचा पुतळयाच्या तोडफोडीत सहभाग असल्याचे समोर आले तर त्यांच्यावर पक्षाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. अमित शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्रिपुरा आणि तामिळनाडूत पुतळयाच्या तोडफोडीप्रकरणी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांवर आरोप होत आहे. त्रिपुरा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा पाडल्याची घटना मंगळवारी घडली तर तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळयाची तोडफोड केल्याने भाजपववर टीका होत होती. अमित शहा यांनी ट्विट करत पुतळयांच्या तोडफोडीच्या घटनांचा विरोध केला. आम्ही अशा घटनांचे समर्थन करत नाही.