सरकार चर्चा करण्यास तयार : राजनाथ सिंह
संसदेच्या अधिवेशनात विविध राजकीय पक्षांच्या सततच्या व्यत्ययावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नाराजी व्यक्त केली. अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. संसदीय कार्यवाहीमध्ये कोणत्याही परिस्थीतीत अडथळा येता कामा नये. विरोधी पक्षाना हव्या असलेल्या क ोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. संसदेचे कामकाज चालू राहण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे अशी मी त्यांना विनंती करतो, असे राजनाथ सिंह म्हणाले. विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आज सलग नवव्या दिवशी थांबवण्यात आले. 5 मार्चपासून लोकसभेचे कामकाज दुपारनंतर तहकूब क रण्यात आले आहे.