मुंबई : मुंबईमध्ये रविवारी सकाळी झालेल्या ‘नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रमा’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित होते. मात्र, अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मुंबईतील दहीसरमध्ये आज सकाळी सात वाजता ’नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री सुधीर मुगंटीवार हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. ’सेव्ह रिव्हर’ या व्हिडिओवर काँग्रेसने निशाणा साधत व्हिडीओमध्ये महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांचाही समावेश आहे. मात्र अशा खासगी कंपनीच्या व्हिडिओत प्रशासकीय अधिकारी कसे सहभागी होऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली. यावर उत्तर देत हा व्हिडिओ सरकारने तयार केलेला नसून, ‘रिव्हर मार्च’ या सामाजिक संस्थेने केल्याचे स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं. रिव्हर मार्च ही कोणतीही नोंदणीकृत संस्था नसून ते एक अभियान आहे.
नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाला मुख्यमंत्री अनुपस्थित
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:55
Rating: 5