पाककडून पुन्हा शस्त्रसंधी ; भारतीय लष्कराकडून 4 पाक सैनिकांचा खात्मा
जम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील नियंत्रण रेषेवर शनिवारी रात्री जोरदार गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाळाकोट भागातील सीमेवर रात्री उशीरा सुरू झालेला गोळीबार दोन तास चालल्याचे पोलीस अधिकार्याने सांगितले. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे सांगत पाकिस्तानने चौक्या व गावांना लक्ष्य बनवले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. यावर्षीच्या सुरूवातीपासून पाकिस्तानने नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. मागील 48 तासांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत 4 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. परंतु पाकच्या गोळीबारात दोन भारतीय सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तान गोळीबार करत आहे. परंतु भारतीय सैन्याने पाकला चोख प्रत्युत्तर देण्यासोबतच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पाकिस्तानी सैन्य मागील अनेक दिवसांपासून सीमेनजीकच्या पुंछ आणि राजौरी जिल्हयात 120 आणि 88 मिलीमीटरच्या मॉर्टारने सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार करत आहे. यामुळे परिसरातील लोकांना इतरत्र आश्रय घेणे भाग पडले आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सीमेनजीकच्या घरांना मोठे नुकसान पोहोचले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव लोकांना घरातच थांबण्याची सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. याचबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या सर्व शाळा 5 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सीमेवर सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन केल्यावर पाकिस्तान भारतालाच याचा दोष देत आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने भारताचे उच्चायुक्त जे.पी. सिंग यांना पाचारण करून विरोध नोंदविला होता. यंदा भारतीय सैन्याने 415 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा कांगावा करत पाकिस्तानने 20 नागरिक मारले गेल्याचा दावा केला.