Breaking News

काजू बियांची आवक मंदावली !

सिंधुदुर्गनगरी - दोडामार्ग तालुक्यात काजू बियांना दर चांगला मिळत असला तरी आवक मात्र कमी आहे. साटेली भेडशीच्या आजच्या आठवडा बाजारात काजू बी प्रतिकिलो 170 रु.दराने खरेदी केली जात होती. मात्र दरवर्षीच्या तुलनेत या वेळेला केवळ 25 टक्केच उत्पन्न शेतकर्‍यांच्या हाती आल्याचे सांगण्यात आले. 


आठवडाभरापासून काजू बियांची विक्री सुरु झाली आहे. मागच्या शनिवारी काजूचा दर प्रतिकिलो 160 रुपये होता. पण काजूची आवक अत्यल्प होती. यावेळीच्या बाजारात आवक थोड्या प्रमाणात वाढली आहे. पण गतवर्षीच्या तुलनेत तो आकडा पंचवीस टक्के इतकाच आहे.दोडामार्ग तालुका काजू उत्पादनाच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. तालुक्यात सेंद्रिय काजूचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील पहिला संद्रीय काजू उत्पादन क रणारा तालुका अशी दोडामार्गची ओळख आहे. पण, यावर्षी गेल्या महिन्यात अचानक पाऊस पडला, दमट हवामान काही दिवस कायम राहिले. त्यामुळे काजू मोहर आणि फुले गळून पडली. फलधारणा झालेल्या काजुवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. शिवाय ओखी वादळामुळे काजूची फलधारणा आणि मोहरही लांबणीवर पडला. साहजिकच उत्पादन मिळण्यास साधारणपणे महिनाभर उशीर झाला. या सगळ्या बाबींचा परिणाम आता काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.