Breaking News

आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आव्हान स्विकारावेच लागेल : विखे

प्रवरानगर प्रतिनिधी  - बदलत्या तंत्रज्ञानामुळे श्रम करण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. येणारा प्रत्येक दिवस नवीन तंत्रज्ञान घेऊन येणारा असल्याने मूलभूत संशोधन ही काळाची गरज बनली आहे. शिक्षण क्षेत्रांत होणाऱ्या हस्तक्षेपामुळे प्रगत शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यास आपण कमी पडत आहोत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी घडविण्याचे आव्हान प्राद्यापकांना आता स्विकारावेच लागेल, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संलग्नित ११ महाविद्यालयांचा एकत्रित पदवीदान समारंभ विखे यांच्या अध्यक्षतेखाली गंगुबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियममध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हापरिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अनिल विखे, जेष्ठ संचालक के. पी. नाना आहेर, ज्ञानदेव म्हस्के, अण्णासाहेब भोसले, भागवतराव घोलप, किशोर नावंदर, बन्सी तांबे, अप्पासाहेब दिघे, सोपानराव दिघे, बाळासाहेब आहेर, आबासाहेब घोलप, सहसचिव भारत घोगरे आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे यांनी प्रास्तविक केले.

विखे म्हणाले, पद्मश्री विखे पाटील यांनी सुरु केलेल्या पब्लिक स्कूलमध्ये पहिल्या वर्षी दाखल होण्याचे भाग्य मला मिळाले असले तरी टेलिव्हिजन, कॉम्पुटर, इंटरनेट नसलेल्या त्या काळामध्ये अकरावीपर्यंतच्या शिक्षणाचेसुद्धा मोठा अप्रुप होते. आजचे तत्रंज्ञान डेटा हॅकिंगपर्यंत पोहचले आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे श्रम करण्याची प्रवृत्ती कमी झाली. येणारा प्रत्येक दिवस नवीन तंत्रद्यान घेऊन येणारा असल्याने मूलभूत संशोधन हे जीवनामध्ये क्रांतीकारक ठरणार आहे. डॉ. एन. एन. मालदार म्हणाले यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.