Breaking News

येडियुरप्पा सरकार भ्रष्टाचारी अमित शाह यांची जीभ घसरली; भाजपच्या उमेदवाराचाच अप्रत्यक्ष दाखला


बंळुरू/वृत्तसंस्था : कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल मंगळवारी वाजले आहेत. याचदिवशी पत्रकारपरिषदेत बोलतांना भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांची जीभ घसरली, आणि त्यांनी सिद्धरामय्या सरकारऐवजी येडियुरप्पा सरकार हे एक नंबरचं भ्रष्टाचारी सरकार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. अमित शाह सध्या कर्नाटक दौर्‍यावर असून पत्रकार परिषदेत ते काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत होते. शेतकर्‍यांच्या निमित्ताने त्यांनी सिद्धरामय्या सरकारवर टीका केली. शेतकर्‍यांचा मृत्यू होत असताना सरकार झोपलं आहे, असं ते म्हणाले. मात्र सिद्धरामय्या सरकारला घेरताना त्यांच्या तोंडून आपल्याच मागील सरकारसाठी टीकेचे शब्द बाहेर पडले.सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांनी असे म्हटले होते की, भ्रष्टाचारासाठी कुठलं सरकार पात्र असेल तर ते येडियुरप्पांचे सरकार. असे अमित शाह म्हणताक्षणीच शेजारी बसलेल्या व्यक्तिने चूक निदर्शनास आणली असून शाह यांनी लगेच चूक सुधारत सिद्धरामय्या सरकार अशी दुरूस्ती केली. अर्थात, व्हायचं ते नुकसान होऊन गेले. यानंतर आपल्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडल्याचं जाणवल्यानंतर अमित शाहांनी शब्द फिरवले