शहीद जवान सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी तीन जागा
पुणे : शहीद जवान सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी पालिकेने तीन जागा सुचविल्या आहेत. त्यापैकी कोणत्या जागी स्मारक करायचे याचा निर्णय कुटूंबीयांनी घ्यावा, असे पालिके तील बैठकीत ठरले. शहीद जवान सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधीपक्षनेते चेतन तुपे, नगरसेविका वैशाली बनकर, आबा तुपे, सौरभ फराटे यांचे आई-वडील, प्रशांत सुरवसे आदी उपस्थित होते. सौरभ फराटे यांच्या स्मारकासाठी पालिकेने तीन जागा सुचविल्या आहेत. त्यात बनकर शाळा, दवाखाना आणि चेतन तुपे यांच्या प्रभागातील उद्यान याचा समावेश आहे. त्यापैकी कोणत्या जागी स्मारक करायचे याचा निर्णय कुटूंबीयांनी घ्यावी, असे पालिकेतील बैठकीत ठरल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.