Breaking News

टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक गुढ्या! ‘संस्कार बालभवन’चा उपक्रम


येथील गीता परिवार संचलित संस्कार बालभवनमध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाचे जोषात स्वागत करण्यात आले. यावेळी संस्कार बालभवनच्या बालकांनी टाकाऊ वस्तूंपासून सुंदर देखण्या गुढ्या तयार केल्या. या उपक्रमाचे सर्वत्र मोठे कौतूक होत आहे. 

संस्कार बालभवनमध्ये सतत नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. यंदा गुढी पाडव्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून गुढी तयार करण्याचा उपक्रम बालभवनच्या प्रशिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. मकर संक्रांतीच्या सणासाठी वापरण्यात आलेली बोळकी रंगवून त्यांचा गुढीच्या अग्रभागी ठेवण्यासाठी या बालकांनी कलश बनविले. छोट्या काठ्यांना रंगवून रंगीत कागदांची झालर लावून सर्वांनी रंगीबेरंगी गुढ्या तयार केल्या. सर्वांनी परस्परांना नवीन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. संस्कार बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी व सचिव गिरीश डागा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षिका रुपाली रायकर, ज्योती भालेराव, रेखा शिंदे, गौरी जोर्वेकर, मंगल सातपुते आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.