Breaking News

भुसावळ उपनगराध्यक्षपदी लक्ष्मी मकासरे बिनविरोध

मुंबई/ भुसावळ, - भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख रमेश मकासरे यांच्या पत्नी लक्ष्मी रमेश मकासरे यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली. 

भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे एकमेव उमेदवारी अर्ज लक्ष्मी रमेश मकासरे यांचा असल्याने त्याची भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.भुसावळ नगरपरिषदेतील सर्व पक्षीय नगरसेवकांमधून लक्ष्मी रमेश मकासरे यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त कळताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांती मुळेच माझ्या सारख्या भीमसैनिक महिलेला भुसावळ च्या उपनगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला असल्याची कृतज्ञ भावना लक्ष्मी रमेश मक ासरे यांनी आपली निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. 
भुसावळ मधील सर्व नगरसेवकांचे व भुसावळ मधील जनतेचे आभार मानून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांचे आभार मेश मकासरे आणि नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांनी मानले आहेत. आरपीआय आणि भाजप युतीच्या लक्ष्मीताई मकासरे यांची बिनविरोध निवड झाल्याने भुसावळ मधील आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण आहे. भुसावळच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मी मकासरे यांचे राज्यभरातून रिपब्लिकन परिवरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.