भोजडेत सुविधा केंद्राची मागणी
कोपरगाव : तालुक्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगटाच्या भोजडे येथे सुविधा केंद्र व्हावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात सार्वजनिक बांधकामंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या सुविधाकेंद्रासाठी भोजडे हे गाव सर्वार्थाने योग्य आहे. त्यामुळे या ठिकाणीच सुविधा केंद्र सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन सेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे आणि कोषाध्यक्ष विक्रम सिंगर यांनी मंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.