कळसूबाईच्या शिखरावर गुढी उभारुन मराठी नववर्षाचे स्वागत
इगतपुरी, दि. 19, मार्च - राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखरावर आज नवीन वर्षाची गुढी उभारुन मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या दरवर्षी पहाटे पाच वाजता गिर्यारोहण करणार्या युवकांनी आज पहाटे हा अनोखा उपक्रम राबविला.नववर्षाच्या प्रथम पहाटेच शिखरावर जावून गुढी उभारली. याचवेळी उगवत्या सूर्याचे शिखरावरच दर्शन घऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.या अनोख्या उपक्रमाने स्वागत करण्यात आले.
इगतपुरी तालुका अन कळसूबाईचे शिखर हे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. जीवनात एक तरी वेळेस महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर जावे. ही प्रत्येक मानवाची मनोकामना असते. मात्र घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे कार्यकर्ते हे अपवाद आहेत. हे कार्यकर्ते तर नवरात्रात तर दररोज उपाशीपोटी कळसुबाईच्या शिखरावर जातात .तसेच वर्षभरात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून हे युवक नेहमीच शिखरावर जाउन ख-या निसर्गाचा आनंद घेतात.
जिल्ह्यातील ट्रेकिंगवीर मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, अशोक हेमके, बाळू आरोटे, प्रशांत जाधव, उमेश दिवाकर, संतोष म्हसने, ज्ञानेश्वर मांडे, प्रवीण भटाटे, पंढरीनाथ भटाटे, किसन दराने, आदिनाथ भगत, गोरख डगळे व इतर सदस्य उपस्थित होते.
ओढ देवी दर्शनाची आणि नववर्षाच्या सूर्यदर्शनाची : नववर्षाचे स्वागत कलासुबाईच्या शिखरावर जावून गुढी उभारुण करावी असा संकल्पच या मराठीप्रेमी युवकांनी केली होती त्या अनुषंगाने या युवकांनीच आज पहाटेच् घोटी येथून मोटरसायकलवर बारी येथे धाव घेतली तेथून चक्क दीड तासात कळसूबाईच्या शिखरावर गेले. तेथे विधिवत देवीचे पूजन करुण नववर्षाचा संकल्प केला.तेथेच गुढी उभारुण आपला आनंद व्यक्त केला.यावेळी उगवत्या सूर्याचे स्वागत करुण नववर्षाच्या प्रथम दिनाचे स्वागत केले.
कळसुबाईच्या सर्वोच्च शिखरावर जावून नविन वर्षाच्या स्वागताची गुढी उभारन्याची संधी मिळाली त्याचा खरा आनंद घेतला हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे गुढी उभारुण स्वागत केले जाते हां आदर्श आहे इंग्रजी वर्षाचा मात्र समारोप ( थर्टी फस्ट ) साजरा होतो त्यामुळेच गुढी उभारण्याला महत्व आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सर्वात उंच गुढी उभारण्याचे भाग्य लाभले.
- भगीरथ मराडे (अध्यक्ष तथा ट्रेकिंगवीर )