संगमनेर/प्रतिनिधी - अमरधाममध्ये मयताच्या नातलगांकडून नियमबाह्य पैशांची मागणी करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यास मुख्याधिकाऱ्यांनी निलंबित केले. भास्कर विश्राम शिंदे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागात मजूर म्हणून तो कार्यरत आहे. हल्ली त्याची अमरधाममध्ये नेमणूक करण्यात आलेली होती. शिंदे याने दि. ७ फेब्रुवारीला झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूच्या अंत्यविधीसाठी नियमबाह्यरित्या ७०० रुपयांची मागणी केली होती.
यासंदर्भात नगरपरिषदेकडे तक्रार करण्यात आली होती. पालिकेकडून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शिंदे याने दिलेला खुलासा बेजबाबदारपणाचा व वस्तुस्थितीला धरुन नसल्याचे स्पष्ट करत कर्तव्यात कसूर झाल्याचे जाणवत आहे, असे निलंबन आदेशात स्पष्ट केले आहे. शिंदे याच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. तसेच निलंबनकाळात त्याला मुख्यालयात थांबण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
टाळूवरचे ‘लोणी’ खाणारा कर्मचारी निलंबित
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:45
Rating: 5