Breaking News

‘अमृतवाहिनी’ राज्यातील उत्कृष्ट महाविद्यालय : डॉ. करमळकर


संगमनेर प्रतिनिधी - येथील परिसर गुणवत्ता, नियोजन, पारदर्शक कारभार इतरांसाठी अनुकरणीय आहे. ग्रामीण भागातील वेगवेगळे कला-गुण व कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेली आहे. त्यामुळेच ‘अमृतवाहिनी’ ही शिक्षण संस्था राज्यात अग्रमानांकित उत्कृष्ट महाविद्यालय आहे, असे गौरवोदगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़. नितीन करमळकर यांनी केले .

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा तृतीय पदवीग्रहन समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़. करमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्‍वस्त आ़. डॉ़. सुधीर तांबे होते. यावेळी विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा़. डॉ़. व्ही़. बी़. गायकवाड, डॉ़. प्रफूल्ल पवार, संस्थेचे विश्‍वस्त बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, तुळशीराम भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा़. व्ही़. बी़. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण आदी उपस्थित होते़. यावेळी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्राच्या स्नातकांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले़. 

यावेळी आ. डॉ़. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़. प्राचार्य डॉ़. एम़. ए़. व्यंकटेश यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आलेख शब्दबद्ध केला़. पदवीप्रदान समारंभाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रा़. बी़. एस़. बोरकर, प्रा़. एस़. एस़. सय्यद, उपप्राचार्य प्रा़. ए़. के. मिश्रा, डीन डॉ़. एम़. आर. वाकचौरे, रजिस्ट्रार प्रा़. व्ही़. पी़. वाघे तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, परीक्षा विभाग, विद्यार्थी विभाग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले़ प्रा़. प्रविण मेहेत्रे व प्रा़ मयुरी गाडे यांनी सूत्रसंचालन केले. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. एम़. जे़. चव्हाण यांनी आभार मानले़.