Breaking News

राहाता ते मढी पायी दिंडी सोहळयाचे आयोजन


राहाता प्रतिनिधी - राहाता ते मढी या पायी दिंडी सोहळ्याचे शहरातील नागरीकांनी भव्य स्वागत केले. ढोलताश्यांच्या गजरात नवनाथ महाराजांची प्रतिमा रथात ठेऊन महिलांनी डोक्यावर कलश घेत या दिंडीत सहभाग घेतला. दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. येथील नवनाथ भक्त मंदिरात गोकुळ अष्टमी, धर्मनाथ बीज, महाशिवरात्री, नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा, तात्याभाऊ गाडेकर यांचे पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले जाते. ही पालखी रंगपंचमीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधी स्थळाजवळ पोहोचणार आहे. येथील मंदिराचे पुजारी लहू गाडेकर (भगत), विरभद्र मंदिराचे पुजारी सर्जेराव भगत, रंगनाथ गाडेकर, गंगाधर बनकर, ज्ञानेश्वर गाडेकर, किशोर गाडेकर, सोपान गाडेकर, अशोक गाडेकर आदी नागरिकांनी या पालखी सोहळयाचे नियोजन केले. पालखी सोहळयासाठी राहाता येथील विरभद्र ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले.