महाराष्ट्रातील 10 वस्ती स्तर संघाला आज राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये हिंगोलीतील 3 आणि वसई-विरारमधील 2 वस्ती स्तर संघाचा समावेश आहे. येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज केंद्रीय शहरी व नागरी विकास मंत्रालयाच्यावतीने ‘दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन’ (NRULM) या अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शहरी व नागरी राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी होते. यावेळी सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील नगरपरिषद संचालनालयाचे संचालक डॉ.विरेंद्र कुमार सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रत्येक क्षेत्रातील सिटी मिशन व्यवस्थापन युनिटमधील सदस्यही उपस्थित होते.दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय शहरी आजिविका मिशन अंतर्गत नगरपरिषदेच्या हद्दीतील स्वच्छता राखण्यासाठी वस्ती स्तर संघ नेमण्यात आलेले आहेत. या संघांना वस्ती संघांना कचरा गोळा करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, हागणदारी मुक्त परिसर करण्यासाठी प्रचार-प्रसार करणे, वैयक्तीक तसेच सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी आणि वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे,सार्वजनिक शौचालयाची देखभाल करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, गांडुळ खत निर्मिती करणे अशी कामे सोपविण्यात आली होती, जाणीव जागृती मोहीम राबविणे, आरोग्य विषयी जागरूकता मोहीम राबविणे, अशी कामे सोपविण्यात आली होती. यामध्ये ज्यांनी सर्व मापदंड पूर्ण केले अशा वस्ती स्तर संघांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील १० वस्ती स्तर संघाला राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:29
Rating: 5