Breaking News

विखे पॅटर्नचा खा. गांधींना भरला धसका,खा. गांधींच्या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ

लोकसभेची निवडणूक दक्षिणेत लढवणार असल्याचे विखे पिता-पुत्रांनी रणंशीग फुकले आणि खा. दिलीप गांधी यांची झोपच उडाली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिवावर एकदा नव्हे तर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यामध्ये केंद्रिय जहाज बांधणी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तरिही तळमळीने काम करणारे कार्यकर्त्यांचा खा. गांधींना पडल्याचे प्रकर्षाने जाणवते. 


विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे यांनी गोरगरीब जनतेची काळजी करत, मागील महिन्यामध्ये तालुक्यातील आ. राहुल जगताप यांचेसह सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर आणत खा. दिलीप गांधी यांना धोक्याची घंटा दाखवून दिली. कायमच दिल्लीला असणारे खासदार आता खडबडून जागे झाले आहेत. विसर पडलेल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना गोवागोव जावून शोधत विकासकामाचा नारळ वाढवत सध्या फिरताना दिसत आहेत. 

परंतू आता दुरावलेले निष्ठावंत कार्यकर्ते पाठ फिरवून निघून जात असल्यामुळे कार्यक्रमाचा फज्जा उडत आहे. काल-परवा हिरडगाव येथील कार्यक्रमात संभा मडपासाठी 13 लाखांच्या कामाचा नारळ फोडण्यात आला, परंतू आमदार समर्थक दोन गाव पुढारी नियोजनात असल्यामुळे नागरिकांनी त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अखेर खासदारपुत्र सुवेंद्र यांनी थोडक्यात आपले भाषण आटपून पुढील सभेची घाईचे कारण सांगत काढता पाय घेतला. या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याने आज तालुक्यासह जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे.