प्रा. शांतीलाल जावळे यांना पीएच्. डी. पदवी प्रदान
येथील एस. एस. जी. एम. कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले व सोनेवाडी येथील प्रा. शांतीलाल जावळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने पीएच्. डी पदवी प्रदान करण्यात आली.जावळे यांनी ‘आर्थिक सुधारणा काळातील चलन अतिवृद्धीचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. यासाठी प्रा. जावळे यांना प्रवरानगरच्या पद्मश्री विखे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. जी. रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. जावळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या एम. जे. एस. कॉलेज, श्रीगोंदा आणि सी. डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर येथे ३१ वर्षे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केलेले आहे. दरम्यान, पीएचडी मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजीमंत्री शंकरराव कोल्हे, माजी आ. अशोक काळे , रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या मीना जगधने आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले. डॉ. बी. बी. कांदळकर, डॉ. बी. बी. निघोट, प्रा. संजय शेटे, प्रा. एन. आर. देवकर, अधीक्षक सुनील गोसावी आदीसंह प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.