Breaking News

जांबे ते आळंदी अशी स्वतंत्र बससेवा सुरु


पुणे,- पुनावळे, माळवाडी, जांबे परिसरातील नागरिकांना आळंदी येथे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) जांबे ते आळंदी अशी स्वतंत्र बससेवा सुरु करण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका रेखा दर्शले आणि अश्‍विनी वाघमारे यांनी पाठपुरावा केला होता. पुनावळे, माळवाडी, जांबे, रिपब्लिकन सोसायटी या परिसरातील विद्यार्थी, नागरिकांना तसेच भाविकांना आळंदी येथे जाण्यासाठी पीएमपीएमएलची स्वतंत्र बससेवा नव्हती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांना शाळा, महा विद्यालयात जाण्यासाठी बस बदलत जावी लागत होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात पोहोचण्यास विलंब होत होता. तसेच भाविकांना आळंदीला जाण्यास देखील अडचणी येत होत्या. यासाठी या मार्गावर पीएमपीएमएलची स्वतंत्र बस सुरु करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. जांबे ते आळंदी मार्गावर स्वतंत्र बस सुरु करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका रेखा दर्शले आणि अश्‍विनी वाघमारे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पीएमपीएमएल प्रशासनाने जांबे ते आळंदी अशी स्वतंत्र बससेवा सुरु केली आहे.