Breaking News

संघटन हीच संघटनेची ताकद - आढाव


संघटना ही गरिबांना न्याय देण्यासाठी हवी. काम करतांना जनहित डोळया समोर असले तर जनता आपल्या पाठिशी राहते. संघटन वाढवताना संघटन महत्त्वाचे आहे. तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन संघटना वाढवली. आता त्यासाठी एक होऊन काम करुन देशपातळीवर संघटना करून लोकांना मदत करुन हा प्रश्न मार्गी लावू, असे अभिवचन राज्य अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारविरोधी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश आढाव यांनी दिले. 
सामाजिक जीवनात गोरगरिब लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासूनयोगदान देणाऱ्या भेंडाळी गावातील संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दशरथ खालकर यांचा सन्मान करण्यातआला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यश विनोद हरणामे, अनिल गांगुर्डे, छावा संघटनेचे विश्वनाथ वाघ, डॉ. दत्ता वाबळे आदी उपस्थित होते. यावेळी विशाल गाडेकर, विश्वास त्रिभुवन, नाना पवार, संजय वायकर, संदीप गोरे, संदीप ठोंबरे, किरण शेटे, निलेश ठोंबरे, बारकू ताते, शोभा पाथारे, रत्ना गवळी, विजय खरात, शांताराम कुरणे , संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.