Breaking News

नेत्र तपासणीद्वारे जनसामान्यांची सेवा : आ. कोल्हे


माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातून जनसामान्यांची सेवा होत आहे, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील कोकमठाण येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान, नील वसंत मेडीकल व रिसर्च फाउंडेशन आणि मणिशंकर आय हाॅस्पीटलच्या सौजन्याने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आ. कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कोकमठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका लोंढे होत्या. प्रारंभी बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे यांनी प्रास्तविक केले. भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी संजीवनीचे माजी उपाध्यक्ष शिवाजी वक्ते, संचालक सुभाष आव्हाड, फकिरराव बोरनारे, उपसरपंच जालिंदर निखाडे, राजेंद्र सोनवणे, निलेश धिवर, सुभाष दुशिंग, राजेंद्र रक्ताटे, सोपान रक्ताटे, माजी सरपंच भाउसाहेब फटांगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बापू बारहाते, भाजपा उपाध्यक्ष रामभाऊ कासार आदींसह पंचक्रोषीतील नागरिक महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी डाॅ. मोहिनी गायकवाड व डाॅ. हेमांगी राठी यांनी डोळयांची काळजी व उपचार याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आ. कोल्हे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला भगिनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. उतारवयात महत्वाची अवयवे निकामी होण्यास सुरुवात होते. वाढती महागाई आणि त्यातच महागलेल्या आरोग्य सुविधांमुळे जनसामान्यांना डोळे, हदय, मधुमेह, मूत्रपिंड या आजाराचे उपचार करणे अवघड होवुन बसते. त्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने पाच पर्षांपासून मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भरविण्यात येते. रवंदे येथे ७७० रुग्णांपैकी १५२ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे या शिबिरात सांगितले. तर कोकमठाण येथे ५६० रुग्ण तपासण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डाॅ. मनोज बत्रा यांनी आभार मानले.