राज्यात उष्माघाताचा पहिला बळी
जळगाव : राज्यात उष्णतेची लाट पसरली असून उष्माघाताचा पहिला बळी जळगावमध्ये गेला आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील म्हसवे येथील शेतकरी वासुदेव श्रावण पाटील यांचा शेतात काम करत असताना दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. पाटील यांना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे पाटील यांची ई सी जी चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालानुसार शरिरात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने वासुदेव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.