Breaking News

शनिवारी सुरू राहणार बँका


पुणे : गुरुवारी महावीर जयंती आणि शुक्रवारी ’गुडफ्रायडे’ची सुटी घेऊन बँका शनिवारी उघडतील. सोशल मीडियावर सलग 4 दिवस बँका बंद राहतील, असा संदेश फिरत आहे. तो चुकीचा आहे. येणारा शनिवार पाचवा आहे. मार्चअखेरचा दिवस. त्यामुळे ग्राहकांच्या सेवेवर कुठलाच परिणाम होणार नाही, असे बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी शाखेचे व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी स्पष्ट केले. मार्चअखेरची बांधणी करून बँका 1 एप्रिलला बंद ठेवण्यात येतात. यंदा 1 एप्रिलला रविवार आहे. त्यामुळे सुटीच असणार. त्याची पुन्हा बदली सुटी नाही. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस दोनच दिवस बँका बंद राहतील.