Breaking News

साबां मंञ्यांच्या आदेशाला फासला हरताळ,सुर्यवंशी ,प्रज्ञा वाळकेंमुळे शासनाला कोट्यवधींचा चुना

मुंबई/विशेष प्रतिनिधी ;- मंञालय आणि आमदार निवास गैरव्यवहारात संशयित म्हणून चर्चेत असलेल्या शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुर्वाश्रमीच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांचे आणखी एक प्रकरण ऊजेडात आले असून रिजाब नंबर नसलेल्या कामांची तब्बल दहा कोटी शहान्नव लाखाची बिले त्यांनी अनाधिकाराने काढल्याचे पुरावे हाती आले आहेत.दरम्यान मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता यांचाही यात मोठा सहभाग असल्याची चर्चा असून त्यांनी पंचवीस टक्के लाच घेऊन तब्बल पंचवीस कोटीच्या कामांना रिजाब दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या संदर्भात प्राप्त माहिती अशी की,18/10/2016 नंतर बांधकाम सचिवांच्या निर्देशानुसार दायित्वांच्या कामांना रिजाब नंबर देणे बंद करण्यात आले.त्यानंतर दि.28 फेब्रुवारी 2017 रोजी साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ज्या कामांना रिजाब नाहीत अशा कामांबाबत कार्यकारी अभियंता यांनी त्यांचे स्तरावर तडजोड क रून देयकाची रक्कम कमी करून देयके अदा करावीत असा निर्णय झाला होता.तथापी सन 2009-10,2010-11,2011-12 या कालावधीतील तपासणी न केलेल्या जवळपास दहा कोटी शहान्नव लाखाची देयक रक्कम कमी न करता कार्यकारी अभियंता कार्यालयाने अदा केल्याचे उघड झाले आहे.साबां मंञ्यांच्या आदेश डावलून कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी शासनाचे कोट्यावधीचे नुकसान केल्याचा हा प्रकार गंभीर असूनही त्यांना दिले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे,