Breaking News

निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलच्या चिमुकल्याचा रामनवमीनिमित्त देखावा


शेवगाव तालुक्यातील निर्मलनगर येथील निर्मल ब्राईट फ्युचर स्कुलच्या नर्सरी व के.जी. च्या विद्यार्थ्यांनी प्रभु श्रीरामांचा देखावा सादर करत अनोखे दर्शन दिले.

रामनवमी निमित्ताने हा देखावा सादर केला. राम-सिता , लक्ष्मण आणि हनुमानजी अशा भूमिका सादर करुन राम लक्ष्मण सिता यांना वडिलांच्या आदेशावरुन रानां-वनात जो वनवास भोगावा लागला, त्या वनवासात सुख-दुखा:चे जे प्रसंग आहेत ते प्रसंग या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी सादर केले.

या कार्यक्रमात राम लक्ष्मण वनवास दर्शवते असे पार्श्‍वगायन स्कूलचे संगित शिक्षक बोडखे सर यानी केले.स्कुलच्या सायली काकडे, प्राचार्य व्यास व उपप्राचार्य कुर्‍हे यानी मुलांच्या या सुंदर भूमिका सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास बालकलाकारांच्या वेशभुषेसाठी श्रीमती खिल्लारी यांनी परिश्रम घेतले.