हरबरा खरेदी केंद्र खर्डा येथे सुरू झाले
नामदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने पुण्यश्लोक कृषी प्रक्रिया सह-संस्था मर्या जामखेड तालुका, हरबरा खरेदी केंद्र खर्डा येथे सुरू झाले आहे. त्याचे भूमिपूजन जामखेड पं. समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उप-सभापती सूर्यकांत मोरे, पं स सदस्य, मा. सभापती डॉ. भगवान मुरुमकर, रवी सुरवसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खर्डाचे सरपंच संजय गोपाळघरे, धामनगावचे सरपंच महारुद्र महारनवर, सोनेगांवचे सरपंच चत्रभूज बोलभट, बांधखडकचे सरपंच केशव वनवे, सातेफळचे सरपंच गणेश लटके, दिघोळचे वि. वि. का. से. सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र गीते, नामदार शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आशोक धेंडे, डॉ. कैलास हजारे, माजी जि. प. सदस्य कांतीलाल खिंवसरा, भागवत सुरवसे, वैजीनाथ पाटील, बाळासाहेब गिते, नाना गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, डॉ. खोत, ग्रा. पं. सदस्य झिक्रे दादा, विजय शिंदे, विजय श्रीरसागर, गणेश डाडर, सरपंच राम भोसले, आनिल धोत्रे, बळीराम दराडे, बाळासाहेब चौधर, बाबासाहेब होडशिळ, व्यापारी दत्ता बरे, सुमित जामकावळे, संजय पेडगांवकर, राजू डोके आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.