निघोज येथील बेडाजंगम समाजाचे अतिक्रमित स्मशानभूमी साठी उपोषण मागे.
तालुक्यातील निघोज येथील बेडाजंगम समाजाच्या स्मशानभूमी जमिनीवर अतिक्रमण विरोधात उपोषण करण्यात आले होते. उपोषणकर्ते निलेश जंगम, बाळासाहेब जंगम, बाबूराव जंगम, राजेंद्र जंगमसह अल्पसंख्याक समाजाचे नागरिकांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी ग्रामपंचायतीकडे येत्या दोन दिवसात आदेश घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उप़़ोषण मागे घेण्यात आले.
यावेळी सदर जमिनीची मोजणी भूमिअभिलेख विभागामार्फत करावे तसेच 4 गुंठे जमीन बेडा समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात यावी, या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तहसिलदार भारती सागरे, पोलिस निरीक्षक गाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे, प्रभारी गटविकास अधिकारी, भूमीअभिलेख अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, मंगेश लाळगे, निवृत्ती वरखडे, सरपंच ठकाराम लंके, उमेश सोनवणे, विलास सोबले, विठ्ठल कवाद, हरुन तांबोळी, प्रभाकर लाळगे, मोती उपाध्याय, भगवान भालेकर, बाबाजी वाघमारे, मंगेश भागवत, मनोहर राऊत, अकबर मोमीन, सुलतान सय्यद, उमरान सय्यद, योगेश खाडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.