Breaking News

विविध गुणदर्शन स्पर्धेत ‘आत्मा मालिक’चे सुयश


कोपरगाव ता. प्रतिनिधी - येथील दामोधर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ आयोजित संस्कृत विविध गुणदर्शन स्पर्धेत ‘आत्मा मालिक’च्या ओम गुरुदेव विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी संस्कृत विषयावरील विविध स्पर्धामध्ये सुयश मिळविले. या स्पर्धामध्ये संस्कृत कथाकथन, काव्यगायन, वक्तृत्व, नाटक व स्तोत्र पाठांतर आदी विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.

या संस्कृत बालनाटय स्पर्धेत ऋषिकेष चितळे, अमेय काळोगे, सतिष चव्हाण, ओम भवर, दिपक जाधव, ऋतुजा ढगे तर कथाकथनमध्ये सुजित लावरे, प्रताप वाळके, तसेच स्तोत्र पाठांतरमध्ये किरण कनुजे, अमेय काळोगे, वैभव नागरे, प्रतिज्ञा सहारे, रुची चुत्तर, नुपुर पाटील काव्यगायनात मानसी पाटील, कल्याणी क्षिरसागर, वैष्णवी वाकचौरे, ऋतुजा घालमे, ऋतुजा ढगे, अस्मिता वरकड, सगरगम पठारे, शिवानी तळेकर, वैष्णवी शिंदे, तन्वी दिघे या विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले

या विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश काळेकर, सागर अहिरे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, किरण गांगुर्डे, शकुंतला खोजे, विजय गडगे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होन, विशवष्ट विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामन कोल्हे आदींनी या विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.