निळवंडे’ मोर्चासाठी हजारो शेतकर्यांचा पाठिंबा
आ. थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयात कृती समितीच्या या मोर्चाला पाठींबा देत सहभागी होण्यासाठी तालुका काँग्रेसची बैठक झाली. यावेळी बाजीराव खेमनर, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. राहाणे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, भाऊसाहेब कुटे, हरिष चकोर, मोहनराव करंजकर, बेबी थोरात आदी उपस्थित होते.
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले निळवंडे धरण माजी महसूलमंत्री आ. थोरात यांनी पूर्ण केले. कालव्यांच्या कामासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मोठमोठी बोगद्यांची कामेही पूर्ण केली. मागील ४ वर्षांत मात्र या कालव्यांची कामे पूर्णपणे थांबली आहेत. येथील एक टोकरीही माती उचलली गेली नाही. कोपरगाव व शिर्डीला पाणी नेण्याच्या नवनवीन योजनांचे नियोजन होत आहे. हे पाणी पहिल्या लाभक्षेत्रातील १८२ दुष्काळी गावांना मिळावे. कारण ते त्यांच्या हक्काचे पाणी आहे. यासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने होणार्या या भव्य मोर्चाला पाठिंबा देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, बाजीराव खेमनर, अजय फटांगरे, आर. बी. राहाणे, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोहिदास पवार, संतोष हासे, बाबा कांदळकर, अवधूत आहेर, अॅड. बाबासाहेब गायकर, संतोष मांडेकर, राजेंद्र चकोर, योगेश सोनवणे, विलास शिंदे, विष्णु रहाटळ, सोपान जोंधळे, माधव हासे, भारत शेलकर, बाबासाहेब मोरे आदींसह दुष्काळी गावांतील सुमारे ३०० तव ४०० कार्यकर्ते उपस्थित होते.