शिर्डी-गुलबर्गा या बसचा शुभारंभ
शिर्डी: साईभक्तांच्या सेवेकरिता राज्य एस. टी. महामंडळाच्या पुढाकारातून परराज्यातील भक्तांसाठी शिर्डी भक्त शिर्डीत यावेत, यासाठी कर्नाटक राज्य सरकारच्या पुढाकारातून शिर्डी ते गुलबर्गा या बसचा शुभारंभ नुकताच शिर्डीत करण्यात आला. साईअरिहंत पतसंस्थेचे चेअरमन सतीश गंगवाल यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी संदीप झावरे, पत्रकार सुदेश पाटणी, एसटी कंट्रोलर बाळासाहेब जगताप, विशाल कोळगे, बबन सांगळे आदी उपस्थित होते.