Breaking News

मोहम्मद शमीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

कोलकता : वादग्रस्त क्रिकेट खेळाडू मोहम्मद शमी याच्या पत्नीने त्याच्यावर तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली असून कोलकता पोलिसांनी पुढील कारवाई क रण्यास प्रारंभ केला आहे. घरगुती हिंसा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, भीती दाखविणे, जखमा करणे, अशा अनेक गुन्हयांची तक्रार त्याच्या विरोधात नोंदवून घेण्यात आली आहे. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने गुरूवारी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ती नोंदवून घेऊन शुक्रवारी पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवाल तयार केला आहे. त्याच्या विरोधातील सर्व गुन्हे गंभीर असल्याने पोलिसांना लवकरच कठोर कारवाई करावी लागेल अशी चिन्हे आहेत.