Breaking News

‘तेलगू देसम’चे बंड; दोन मंत्री राजीनामा देणार


केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने तेलगू देसम पार्टी आणि भाजपमधील तणाव अचानक वाढलेला पाहायला मिळाला. आपला हा अपमान असल्याचे म्हणत आंध्राचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. चंद्राबाबू म्हणाले, तेलगु देसम पार्टीच्या कोटयातील हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू व विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी हे दोन केंद्रीय मंत्री आपल्या पदांचे राजीनामे देतील, असे सांगितले होते. मात्र गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चंद्राबाबू नायडू यांचे फोनवर चर्चा झाली, दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला, दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा का दिला, याबद्दल नायडूंनी मोदींना सविस्तर माहिती दिल्याचे सूत्रांकडून समजते. नायडूंशी चर्चा केल्यानंतर ‘तेलगू देसम’चे केंद्रातील दोन्ही मंत्री पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.एकीकडे मोदींनी चर्चा केली असली तरी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी वायएसआर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी विशेष राज्याच्या मागणीवरुन खोटा प्रचार केला आणि मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले, असा आरोप केला. विशेष दर्जा देण्याबाबत आम्ही आंध्र प्रदेश सरकारशी चर्चा करत आहोत, असे त्यांनी सांगितले.